माझ्यावरच्या कारवाईत माजी मुख्यमंत्र्यांना रस; नवाब मलिकांचे आणखी एक सूचक ट्वीट Saam Tv
मुंबई/पुणे

माझ्यावरच्या कारवाईत माजी मुख्यमंत्र्यांना रस; नवाब मलिकांचे आणखी एक सूचक ट्वीट

नवाब मलिकांचे आणखी एक सूचक ट्वीट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नवाब मलिकांंचे परत एकदा ट्विट केले आहे. केंद्रीय यंत्रणांना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात माजी मुख्यमंत्रीना खूप रस दाखवत आहेत. मी सांगू इच्छितो की, त्यांनी स्वत:ची ओएसडी म्हणून आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) प्रवक्ता म्हणून नियुक्ती करावी" अशी खोचक टीका (Commentary) नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे.

हे देखील पहा-

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाव न घेता नवाब मलिकांनी (nawab malik) खोचक शब्दामध्ये टीका केली आहे. आज सकाळी माझ्या घरी काही अधिकृत पाहुणे (Guests) भेट देणार आहेत, असे सूचक ट्विट (Tweet) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल रात्री केले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून शांत असलेले नवाब मलिक परत एकदा चर्चेत आले आहेत.

मलिकांच्या या ट्विटमुळे वेगळ्याच चर्चा रंगले आहेत. त्यांच्या घरी भेट देणारे पाहुणे म्हणजे नक्की कोण असणार आहेत. याविषयी तर्क- वितर्क लढवले जात आहेत. हे अधिकृत पाहुणे म्हणजे ईडी (ED) किंवा सीबीआयचे (CBI) अधिकारी तर नसणार का? अशा देखील चर्चा रंगत आहेत. पण या पाहुण्यांनी (guests) घरी भेट दिलीच तर त्यांचे मी स्वागत करणार असेही मलिक यांनी ट्विटमध्ये (tweet) सांगितले आहे.

नवाब मलिकांनी काही वेळाअगोदरच इंग्रजीत एक ट्विट केले आहे. यामध्ये ते सांगितले आहे की, 'माझ्या माहितीप्रमाणे काही अधिकृत पाहुणे उद्या सकाळी- सकाळी (morning) माझ्या घरी भेट देणार आहेत. पण मी त्यांच्या स्वागताकरिता चहा (Tea) आणि बिस्किटांसह तयार असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोर धडक; तरुणाचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT