आरोग्यभरती पेपरफुटी प्रकरणी आणखी आरोपी ताब्यात; आतापर्यंत ६ जणांना अटक - Saam Tv
मुंबई/पुणे

आरोग्यभरती पेपरफुटी प्रकरणी आणखी आरोपी ताब्यात; आतापर्यंत ६ जणांना अटक

पुणे पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे : आरोग्य विभागामार्फत (Health Department) गट-ड सेवेतील पदांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर ३० ऑक्टोबरच्या रात्रीच फुटल्याचा प्रकार घडला होता. याबद्दलची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. याच पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आरोग्यभरती पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांकडून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीच पुणे पोलिसांच्या सायबर सेलने एका संशयीताला (ता. १ डिसेंबर) रोजी ताब्यात घेतलं होत. त्यानंतर आरोग्यभरती प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर आता पुन्हा आरोग्यभरती पेपरफुटी प्रकरणी आणखी आरोपी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक झाली झाली आहे. आज आणखी काही जण ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, आरोग्य विभागाच्या सर्व परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गैरप्रकार झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांसह राज्यातल्या विरोधी पक्षाने या परीक्षेतील सावळ्या गोंधळावरून राज्य सरकारला आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना धारेवर धरले होते.

आरोग्य विभागामार्फत गट-ड सेवेतील पदांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर ३० ऑक्टोबर च्या रात्रीच फुटल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. अनेक विद्यार्थ्यांना इन्स्टाग्रामवर पेपर फुटल्याची माहिती मिळाली. सुरवातीपासून आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये या ना त्या कारणाने गोंधळ उडाला होता. पेपर फुटीच्या या गंभीर प्रकाराने राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. फुटलेल्या पेपर मधील १०० पैकी ९२ प्रश्नांमध्ये साम्य आढळल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT