Anna Hazare on Shikhar Bank Case Saam TV
मुंबई/पुणे

Shikhar Bank Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लिनचीटवर अण्णा हजारेंचा आक्षेप; अजित पवार यांच्या अडचणी वाढणार?

Anna Hazare on Shikhar Bank Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणातील पोलिसांनी दिलेल्या क्लिनचिटवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे.

Satish Daud

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने त्यांचा हा आक्षेप मान्य केला असून निषेध याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे. याप्रकरणाची सुनावणी २९ जून रोजी होणार आहे.

शिखर बँकेने २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप केले होते. राज्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले होते. मात्र, ही सर्व कर्जे बुडीत निघाली. याप्रकरणी शिखर बँक संचालकपदी असलेल्या अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

काही महिन्यांपूर्वी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २५ हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला. यामध्ये कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्री संबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं.

त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली. मात्र, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. गुरुवारी (ता. १३) विशेष सत्र न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.

यावेळी हजारे आणि जाधव यांच्या वकिलांनी निषेध याचिका दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला. त्यानुसार न्यायालयाने अर्जदारांना वेळ देत २९ जूनला पुढील सुनावणी ठेवली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. २९ जूनला कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT