ankush chattar, ncp, nagar saam tv
मुंबई/पुणे

Nagar News : खूनी हल्ला झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-याची प्राणज्याेत मालवली, भाजप नगरसेवकासह पाच अटकेत

या घटनेतील काही संशयितांचा शाेध सुरु आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर (ncp leader ankush chattar passes away) यांचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. चत्तर यांच्या निधनाने एनसीपीचा सच्चा कार्यकर्ता गेल्याचे भावना नगर जिल्ह्यात व्यक्त हाेऊ लागली आहे. (Latest Marathi News)

लहान मुलांच्या भांडणातून मोठ्या हाणामारीची घटना नगर शहरातील एकविरा चौकात शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले अंकुश चत्तर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू हाेते. उपचारादरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अंकूश चत्तर यांची प्राणज्याेत मालवली.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी एकविरा चौक परिसरामध्ये लहान मुलांचे भांडण झाले होते हे भांडणे मिटवण्यासाठी अंकुश चत्तर यांनी यांच्या भाच्याला त्या ठिकाणी पाठवले होते. हे भांडणे मिटवल्यानंतर अंकुश चत्तर यांनी सर्व मुलांना तेथून जाण्यास सांगितले त्याच वेळी त्या ठिकाणी राजू फुलारी यांनी अंकुश चत्तर यांना बाजूला घेऊन बोलायचे आहे असे सांगून थांबून ठेवले.

काही मिनिटात दोन मोटार सायकलीवरून काही तरुण आले व त्यानंतर दोन काळ्या रंगाच्या चारचाकी गाडया तेथे आल्या आणि त्यातून उतरलेल्या तरुणांनी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे, गावठी कट्टा होता तुला आम्ही जिवंत सोडणार नाही.

तु स्वप्निल भाऊच्या नादी लागतोस काय असे म्हणत तरुण अंकुश यास मारत होते. त्याचवेळी स्वप्निल शिंदे अंकुश जेथे खाली पडला होता त्या ठिकाणी आला आणि हा संपला का पहा रे, नसेल संपला तर त्यास संपवुन टाका असे म्हणून डोक्यात लोखंडी रॉड पुन्हा मारहाण केली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये बाळासाहेब सोमवंशी यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आला असून भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे (bjp corporator swapnil shinde), त्याचे साथीदार अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कु-हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला.

याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम येथून अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे अशई माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT