Anjali Damania vs Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Anjali Damania on Ajit Pawar: अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांना कार वाटप; अंजली दमानिया यांनी उपस्थित केले ६ प्रश्न

Anjali Damania vs Ajit Pawar: अजितदादा गटाकडून जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एक महागडी गाडी भेट दिली जाणार आहे. याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Satish Daud

Anjali Damania on Ajit Pawar Latest News

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षउभारणीला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांना प्रचार करता यावा, तसंच त्यांचं मनोबल वाढावं यासाठी अजितदादा गटाकडून जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एक महागडी गाडी भेट दिली जाणार आहे. याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जो पक्ष अजुन पक्ष म्हणून घोषित पण झाला नाही , त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या? पैसा कुठून आला? कोणी देणग्या दिल्या? आता ED / ACB आणि EC ने डोळे मिटून घेतले आहेत का? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत का? का अजित पवारांनी (Ajit Pawar) काबाड कष्ट करून कमावलेले पैसे ? कुठून येतात एवढल्या गाड्या ? सामान्य माणसाला एक गाडी घेतांना देखील नाकी नऊ येतात, असं ट्वीट करत अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात येणार असून अजित पवार यांच्या गटाकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची टेस्टिंग सुरु आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून आतापर्यंत ४० गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. याशिवाय, आणखी ६० गाड्या लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत. या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची किंमत साधारण १० लाख ते २२ लाख इतकी असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT