Anil Parab News, Kirit Somaiya News, Kirit Somaiya on Anil Parab Saam Tv
मुंबई/पुणे

रिसॉर्टला पैसे आले कुठून याचा हिशोब द्यावा लागणार: किरीट सोमय्या

अनिल परब यांचा पूर्व नियोजित दौरा असल्यामुळे ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना काल ईडीने समन्स बजावले. आज १५ जून रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बाजवले होते, पण आज मंत्री अनिल परब यांचा पूर्व नियोजित दौरा असल्यामुळे परब ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी परब यांच्यावर टीका केली आहे. परब यांना ईडी कार्यालयात यावे तर लागणारच आहे, रिसॉर्टचे पैसे आले कुठून याचा हिशोब तर द्यावा लागणार, असा टोला सोमय्या यांनी परब यांच्यावर लगावला. (Kirit Somaiya on Anil Parab)

काल रात्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने समन्स बजावले. दापोली रिसॉर्ट प्रकरणी हे समन्स पाठवले आहे. काही दिवसापूर्वी परिहवन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर ईडीची धाड पडली होती. या धाडीत त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. आता ईडीने पुन्हा समन्स बजावले आहेत.

किरीट सोमय्या म्हणाले, आज अनिल परब यांनी पुन्हा ईडी कार्यालयात जाण्यासाठी दांडी मारली आहे. त्यांना ईडी कार्यालयात तर जाव लागणारच आहे. आज नाही गेले तर उद्या परवा जावे लागणार आहे, राहुल गांधीना देखील जावे लागले आहे. दापोली मधील रिसॉर्टला पैसे कुठून आले याचा हिशोब तर द्यावा लागणारच आहे, असा टोलाही सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लगावला.

दापोलीतील रिसॉर्टला पैसे खरमाटे यांच्याकडून मिळाले के सचिन वाझे यांच्याकडून मिळाले, याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. सचिन वाझे आता माफीचा साक्षीदार झाला आहे, त्यामुळे आता हिशोब द्यावा लागणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.

अनिल परब ईडी चौकशीला गैरहजर?

शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) ईडी चौकशीला जाणार नसल्याची माहिती आहे. साई रिसॉर्टप्रकरणी त्यांना समन्स (ED Summons) पाठवण्यात आलं होतं. आज 11 वाजता त्यांची चौकशी होणार होती. पण आधीच्या नियोजित कामामुळे ते चौकशीला हजर राहणार नाहीत.

मात्र, असं असलं तरी, अनिल परब यांचे वकील ईडी कार्यालयात जाणार आहेत आणि काही कामामुळे परब हजर राहणार नसल्याची माहिती ते ईडीला देणार आहे. साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : प्रेमाच्या भरात चुका करू नका! जोडीदारामध्ये लग्नाआधी दिसणारे ‘हे’ संकेत दुर्लक्ष करणे पडेल महागात

Pune : पुण्यात आयटी इंजिनियरनं आयुष्य संपवलं, १५ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra News Live Update: बीड- संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी

वर्षातून फक्त 3 महिनेच मिळतं हे फळ; आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर

Weight Loss Drink: वजन आणि पोटावरील चरबी कमी करायची आहे? मग रोज प्या 'हे' ५ हेल्दी ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT