Anil Deshmukh saam tv
मुंबई/पुणे

Anil Deshmukh : अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून आज, बुधवारी जामिनावर सुटका झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Anil Deshmukh News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून आज, बुधवारी जामिनावर सुटका झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडले आहे. (Latest Marathi News)

अनिल देशमुख मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडले आहेत. अनिल देशमुख कारागृहातून बाहेर पडल्यानंतर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाण्याची शक्यता आहे. यानंतर ते वरळी येथील आपल्या सुखदा निवासस्थानी दाखल होणार आहेत. वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग व घराबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अनिल देशमुख हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे. कोर्टाची मुंबई सोडण्याची परवानगी नसल्याने अधिवेशनात त्यांना सहाभागी होता येणार नाही. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत.

अनिल देशमुख यांच्यावर आरोप काय आहे ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी वसूलीचे आदेश दिले होते. या आरोपांची सीबीआय आणि ईडी तपास करत आहे. या प्रकरणात ऋषिकेश देशमुख देखील सक्रिय असल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दूषित पाणीपुरवठा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

RSS आणि भाजप नेत्यामध्ये जोरदार हाणामारी; पोलीस स्टेशनबाहेर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा गराडा, परिसरात तणावाचं वातावरण

Kalyan Pali Bus : कल्याण-डोंबिवली ते पाली एसटी बस सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा; वेळापत्रक जाणून घ्या

Pune Fake Lady Police Arrested: पुण्यात 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश! तरुणीकडून दोन पोलिस गणवेश जप्त

पिंपल्स आणि काळे डाग होतील गायब! ग्लोईंग स्किनसाठी घरीच करा संत्र्याच्या पावडरचा जादुई उपाय

SCROLL FOR NEXT