Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Anil Deshmukh : सचिन वाझेच्या आरोपानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांची चाल..."

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेने केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया दिली.

Satish Daud

मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी पुन्हा एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. अनिल देशमुख आपल्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे याचे पुरावे सीबीआयकडे असल्याची माहिती सचिन वाझेंनी दिली. त्यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या आरोपाला उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

सचिन वाझे यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांनी जाहीर पत्रकारपरिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकण्यासाठी माझ्यासमोर प्रस्ताव आणला होता. माझ्याकडून शपथपत्र देखील लिहून घेण्याचा प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते आता मला टार्गेट करताहेत, असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय.

पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही, की सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असून तो विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही. मुंबई हायकोर्टानेही सचिन वाझेबाबत हेच स्टेटमेंट दिलंय. अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर आरोप लावताहेत. त्यामुळे जनतेला मी सांगू इच्छितो, की सचिन वाझेचे आरोप खोटे आहेत", असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा सचिन वाझेवर आरोप आहे. याच आरोपाखाली ते गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्याचरबरोबर मन्सुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात देखील सचिन वाझे आरोपी आहेत.

१०० कोटींच्या खंडणी प्रकरणात ते माफीचा साक्षीदार बनले आहेत. त्यानंतर तुरुंगामधून सुटका करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली होती. आता वैद्यकीय तपासणीला जात असताना सचिन वाझे याने एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना अनिल देशमुख यांच्यावर पैसे घेण्याचा आरोप केल्यामुळे या प्रकरणामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT