Andheri By-Election BJP-Mahayuti Candidate saam tv
मुंबई/पुणे

Andheri By-Election : अंधेरी पोट निवडणुकीसाठी भाजप-महायुतीचा उमेदवार ठरला

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप-महायुतीचा उमेदवार ठरला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Andheri By-Election BJP-Mahayuti Candidate : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri By-Election) भाजप-महायुतीचा उमेदवार ठरला आहे. मुरजी पटेल हे महायुतीचे उमेदवार असणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता मुरजी पटेल हे उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये थेट लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Maharashtra News)

शिवसेवनेच्या शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह आणि नाव मिळाल्यावर दोघांकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच दोन्ही गटाकडून आता उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना तर भाजप-महायुतीकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांनी युतीच्या बंडखोर उमेदवार मुरजी पटेल यांचा पराभव केला होता. मात्र दुर्दैवाने मे 2022 मध्ये रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे अंधेरी पूर्व 166 विधानसभेची जागा रिक्त झाली. याच जागेसाठी आता रमेश लटके आणि मुरजी पटेल यांच्यात सामना रंगणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. पण आता त्यांच्यासमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. कारण, ऋतुजा लटके यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. यामुळे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाची पालिकेत धावाधाव सुरू झाली आहे.

ऋतुजा लटके करणार होत्या शिंदे गटात प्रवेश?

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या शिंदे गटात प्रवेश करणार होत्या, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. अंधेरी पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार मुर्जी पटेल यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी लटके यांनी केली होती. मात्र, मुर्जी पटेल यांनी कोट्यवधीखर्च केल्यामुळे मी माघार घेणार नाही असा संदेश पक्षश्रेष्ठींना दिला. त्यामुळेच लटके यांनी शिंदे गटात आल्या नाहीत. अशी माहिती सूत्रांनी दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

Maharashtra Live News Update : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

SCROLL FOR NEXT