अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर यंदाच्या श्रावणातही बंदच! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर यंदाच्या श्रावणातही बंदच!

केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत दैनंदिन पूजा होणार

अजय दुधाणे

अंबरनाथ - प्राचीन शिव मंदिर Shiv Mandir यंदाच्या श्रावणातही Shravan भाविकांसाठी बंदच राहणार आहे. केवळ मंदिराच्या परंपरागत पुजाऱ्यांकडून दैनंदिन पूजाअर्चा केली जाईल. यामुळे भाविकांचा मात्र सलग दुसऱ्या वर्षी हिरमोड होणार आहे.

अंबरनाथचं Ambernath शिवमंदिर हे तब्बल ९६१ वर्ष जुनं असून शिलाहार राजांनी हे मंदिर उभारल्याची नोंद आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचाही उत्कृष्ट नमुना मानले जाते. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीतही अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या समावेश आहे. तर अतिशय जागृत देवस्थान अशी या मंदिराची संपूर्ण राज्यात ख्याती आहे.

हे देखील पहा -

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं इतिहासात पहिल्यांदाच हे मंदिर श्रावण महिन्यात बंद ठेवण्याची वेळ आली. यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला, तरी मंदिरं उघडायला अजूनही शासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी प्राचीन शिवमंदिर भाविकांसाठी बंद ठेवले जाणार असल्याची माहिती मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांनी दिली आहे.

प्राचीन शिवमंदिर हे भाविकांसाठी बंद असलं, तरी मंदिराचे परंपरागत पुजारी असलेले अंबरनाथ गावातील पाटील कुटुंबीय मंदिरात दैनंदिन पूजा अर्चा आणि अभिषेक करतील. मात्र सामान्य भाविकांसाठी मंदिर पूर्णपणे बंद असेल. त्यामुळे भाविकांना यंदाही आपल्या भोलेनाथाच्या दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळं यंदा तरी कोरोनाचं संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना भोलेनाथाकडे केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT