CM Uddhav Thackeray यांच्या गाडीच्या ताफ्यात अज्ञाताने घुसवली गाडी  
मुंबई/पुणे

CM Uddhav Thackeray यांच्या गाडीच्या ताफ्यात अज्ञाताने घुसवली गाडी

सुरक्षा कायद्यानुसार चालकावर गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या गाडीच्या ताफ्यात एका अज्ञात चालकाने त्याची गाडी घुसवल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली. मुख्यमंत्री साकीनाका अत्याचार प्रकरणी (Sakinaka case) पोलिस अधिकाऱ्यांची बैठक संपवून वर्षा या शासकिय निवासस्थानी जात असताना हा प्रकार घडला.

हे देखील पहा-

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात सुरक्षेसाठी असलेल्या रक्षकांनी त्याला ताफ्यातून बाहेर पडण्याचा इशारा केला. हा चालक वेडी वाकडी गाडी चालवत होता. त्याने कानात इअरफोन लावल्याने सुरक्षा रक्षकांकडे त्याचे लक्ष नव्हते. अखेर काही अंतरावर गेल्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी थांबवली. पोलीसांनी केलेल्या चौकशीत संबंधित ड्रायव्हर हा मोठा व्यापारी असून मलबार हिलमधील एका निवासी इमारतीत राहत असल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणी सुरक्षा कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT