अमृता फडणवीसांचा राऊतांना टोला; नावं न घेता म्हणाल्या 'बिल्ली' ने की दहाड़ने की कोशिश.. Saam TV
मुंबई/पुणे

अमृता फडणवीसांचा राऊतांना टोला; म्हणाल्या, फिर एक 'बिल्ली' ने कोशिश की है !

माजी मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील त्यांच्या ट्विटर वरुन नाव न घेता राऊतांवरती निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनामध्ये आपण महत्वाची महत्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा काल केली होती आणि त्यानुसार आज राऊत यांनी ती पत्रकार परिषद (Press conference) घेतली. या पत्रकार परिषदेच्या आधीच अनेक शिवसैनिक मुंबईमधील शिवसेना भवनाजवळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेला शिवसेना नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. यावेळी राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरती अनेक घणाघाती आरोपही केले आहेत. मात्र त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजपने मात्र ही परिषद म्हणजे फुसका बार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अशातच आता माजी मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील त्यांच्या ट्विटर वरुन नाव न घेता राऊतांवरती निशाणा साधला आहे. 'आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !' अशा शब्दात त्यांनी राऊतांच्या पत्रकार परिषदेवरती टीका केली आहे.

Edited By - jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणत्या भाषेत स्वराज्याचे व्यवहार चालायचे?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

नराधमाचे हैवानी कृत्य, अपहरण करून ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, नाक,तोंड अन् प्रायव्हेट पार्टमधून...

Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली

Blouse Back Designs: ट्रेंडी आणि यूनिक बॅक ब्लाउज डिझाईनसाठी 'हे' पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT