MLA Ravi Rana saam tv
मुंबई/पुणे

आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ; अमरावती पोलिसांकडून वॉरंट जारी

येत्या २० जून रोजी हाय हायकोर्टाच्या मुंबई खंडपीठात रवी राणा यांची तारीख आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात सर्व पक्षांची विधान परिषद निवडणुकासाठी आमदारांची जुळवा- जुळव सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. अमरावती पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट घेऊन पोलीस (Police) खार येथील राणा यांच्या फ्लॅटवर आले आहेत, पण राणा हे कोटा येथे गेले असल्याने वॉरंटची अंमलबाजवणी झालेली नाही.

पोलिसांचे पथक सध्या परत येत असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या २० जून रोजी हाय हायकोर्टाच्या मुंबई (Mumbai) खंडपीठात रवी राणा यांची तारीख आहे, त्याच दिवशी विधान परिषदेची निवडणूक सुद्धा आहे.

अमरावती (Amaravati) येथे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ मार्च रोजी राजापेठ येथे युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती. याप्रकरणी बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्यावर देखील शासकीय कामात अडथळा व हत्येचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आमदार रवी राणा यांनी याप्रकरणी अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे, मात्र अमरावती पोलिसांनी (Police) अटकपूर्व जामीन रद्द करावा यासाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

मागे झालेल्या एका तारखेवर आमदार रवी राणा (Ravi Rana) हे गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात हायकोर्टाच्या नागपूर (Nagpur) खंडपीठाने बेलेबल वॉरंट बजावले आहे. वारंट घेऊन अमरावती पोलिसांचे पथक व मुंबई पोलिसांचे पथक रवी राणा यांच्या खार येथील फ्लॅटवर पोहोचले आहेत, मात्र आमदार रवी राणा हे कोटा येथे गेले असल्याने या वारंटची बजावणी होऊ शकली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT