Amit thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Amit Thackeray News : अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात उतरणार? मनसे नेत्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? पाहा व्हिडिओ

amit thackeray will contest maharashtra assembly election : अमित ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवावी,अशी मनसे नेत्यांनी राज ठाकरेंसमोर बोलून दाखवली. यानंतर अमित ठाकरे विधानसभेच्या आखाड्यात उतरणार का, हे पाहावे लागेल.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनेही दंड थोपटले आहेत. या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विविध मतदारसंघात मनसेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा मनसे नेत्यांनी व्यक्त केली आहे. मनसे नेत्यांच्या आग्रहानंतर अमित ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडुकीत अमित ठाकरेंनी निवडणुकीत उतरावं, अशी मनसे नेत्यांनी बैठकीत इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मनसे नेत्यांनी ही मोठी इच्छा व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात मनसे नेते आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे. अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवल्यास ते राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. या तीन विधानसभा मतदारसंघात दादर माहीम मतदारसंघ, भांडुप मतदारसंघ, मागाठाणे या मतदारसंघाचा समावेश आहे.

अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून रिंगणात उतरू शकतात?

- दादर माहीम मतदारसंघ

दादर माहीम मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. हा मराठमोळा मतदारसंघ असून २००९ साली हा मनसेचा बालेकिल्ला होत. त्यांच्या उमेदवारीमुळे मनसे हा मतदारसंघ पुन्हा काबीज करू शकतो, यामुळे कार्यकर्त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

भांडुप मतदारसंघ

भांडुप विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी १५० पदाधिकारी सह्यांचं पत्र राज ठाकरे यांना दिलं आहे. या पत्रात मराठमोळ्या भांडुप मतदारसंघाचे विधानसभेसाठी अमित ठाकरे यांना उमेदवारी द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मागाठाणे मतदारसंघ

मागाठाणे मतदारसंघ हा देखील मनसेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मनसेची ताकद आहे. त्यामुळे २००९ या वर्षाचा मनसेचा हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यासाठी सह्यांचे पत्र राज ठाकरे यांना सादर करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे होणार आमदार? पाहा Exit Poll

Kopargaon News : बसच्या सीटखाली विद्यार्थ्यांला सापडले नोटांचे बंडल; मतपेट्या आणलेल्या बसमध्ये रक्कम सापडल्याने खळबळ

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT