Arrest , Ambernath  Saam Tv
मुंबई/पुणे

तुषार गुंजाळ हत्या प्रकरणी शिंदे, चिकणेला अटक; साथीदारांचा शाेध सुरु

या प्रकरणात अजूनही ३ संशयित आरोपी मोकाट असून त्यांचा माग काढणं आता पोलिसांना सोपं होणार आहे.

अजय दुधाणे

Ambernath News : अंबरनाथ येथील तुषार गुंजाळ हत्येप्रकरणी पोलिसांनी (police) दोन जणांना अटक (arrest) केली आहे. शंकर शिंदे आणि सचिन चिकणे अशी या दोघांची नावं आहेत. तब्बल दीड महिन्यानंतर पाेलिसांनी संशयित आराेपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अंबरनाथमध्ये २९ जुलै रोजी तुषार गुंजाळ या तरुणाची दिवसाढवळ्या भरचौकात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पुनर्विकास प्रकल्पातील इमारत निष्कासित करण्याचं काम घेण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या झाली होती. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संजय बिराजदार, शंकर शिंदे, नेपाळी उर्फ रॉकी या तिघांसह एकूण ५ जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापैकी गोळी झाडणारा शंकर शिंदे आणि त्याचा साथीदार सचिन चिकणे या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. शंकर शिंदे याला टिटवाळा परिसरातील एका ढाब्यावरून तर सचिन चिकणे याला अंबरनाथमधूनच बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणात अजूनही ३ संशयित आरोपी मोकाट असून त्यांचा माग काढणं आता पोलिसांना सोपं होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Besan Ladoo Racipe: घरच्या घरी बनवा तोंडात विरघळणारा स्वादिष्ट बेसन लाडू; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर हल्ला

Vacancy...Vacancy !! राम मंदिराच्या CEO पदासाठी भरती; काय आहे अट आणि पात्रता, किती मिळेल मानधन?

पीडित मुलीसह एका रात्री ६ जणांना क्रूरपणे संपवणाऱ्या आरोपीचाही मृत्यू, त्या ६० तासांत नेमकं काय घडलं?

Accident : काळाचा क्रूर घाला! लग्नाला अवघे ६ दिवस झाले अन् सासरहून माहेरी जाताना जागीच मृत्यू; लग्नघर शोकाकुल

SCROLL FOR NEXT