अंबरनाथ पालिकेनं चॉकलेट कंपनीला ठोठावला दंड अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथ पालिकेनं चॉकलेट कंपनीला ठोठावला दंड

अंबरनाथ एमआयडीसीतील कंपनीनं टाकले होते लॉलीपॉप

अजय दुधाणे

अंबरनाथ - शहरातील मोरीवली डम्पिंग ग्राउंडवर Dumping Ground अज्ञातांनी लॉलीपॉप Lollipop टाकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता अंबरनाथ नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून हे लॉलीपॉप टाकणाऱ्या कंपनीला ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अंबरनाथच्या Ambernathमोरीवली पाड्याजवळील बंद डम्पिंग ग्राउंडवर दोन दिवसांपासून लॉलीपॉपच्या गोण्या आणून टाकण्यात आल्या होत्या.

हे देखील पहा -

त्यामुळे डम्पिंग ग्राउंडवर लॉलीपॉपचा अक्षरशः खच पडल्याचे पाहायला मिळाले होते. हे लॉलीपॉप घेण्यासाठी कचरा वेचक मुलांनीही गर्दी केली होती. मात्र हे लॉलीपॉप इथं कुणी टाकले, आणि ते एक्सपायरी डेट झालेले असतील तर त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रश्न यानंतर उपस्थित झाले.

याप्रकारणी अंबरनाथ पालिकेनं लॉलीपॉप टाकणाऱ्या कंपनीचा शोध घेतला असता अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील W 35 क्रमांकाच्या एसआर कन्फेक्शनरी या कंपनीने हे लॉलीपॉप टाकल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कंपनीला अंबरनाथ नगरपालिकेने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, मोरीवली डम्पिंग बंद होऊनही अजूनही अनेक कंपन्या आणि हॉटेल इथे कचरा आणून टाकत असून या सर्वांवर कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO New Rules : नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO चे 'हे' ५ नवीन नियम बदलले; तुमचे पैसे अडकणार नाहीत

Mumbai : रक्षाबंधनाच्या सुट्टीत भावंडांसोबत फिरायचंय? मुंबईजवळची 'हे' पावसाळी पिकनिक स्पॉट्स ठरतील परफेक्ट

Salman Khan Video : 'बिग बॉस २०' मध्ये मोठा ट्विस्ट; स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकणार सदस्य, सलमान खानने दिला इशारा, म्हणाला- "तथास्तु-टू"

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

Rain Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मुंबईसह ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT