Ambernath Heramb Mandir Dress Code  saam tv
मुंबई/पुणे

Heramb Mandir: हेरंब मंदिरात ड्रेस कोड लागू! फाटक्या जीन्स, स्कर्ट घालणाऱ्यांना अंबरनाथच्या मंदिरात NO Entry

Ambernath Heramb Mandir Dress Code : लग्न समारंभाला किंवा पार्टीला जाताना ड्रेस कोड फॉलो करतो, मग मंदिरात येताना सभ्य कपडे आपण का घालू शकत नाही? असा सवाल हेरंब सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमण यांनी केला आहे.

Bharat Jadhav

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

अंबरनाथच्या हेरंब मंदिराने मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. मंदिरात येताना सद्गुणी पोशाखात यावं, फाटक्या जीन्स, स्कर्ट आणि असाभ्य कपडे घालून मंदिरात येऊ नये, असं आवाहन मंदिर समितीने भाविकांना केलं आहे. याबाबतचा फलक मंदिराबाहेर दर्शनी भागात लावण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला होता. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या हेरंब मंदिराने सुद्धा रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय.

आपण लग्न समारंभाला किंवा पार्टीला जाताना ड्रेस कोड फॉलो करतो, मग मंदिरात येताना सभ्य कपडे आपण का घालू शकत नाही? असा सवाल हेरंब सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमण यांनी केलाय. भाविकांना अनेकदा तोंडी सूचना देऊन झाल्या. मात्र तरीही सुधारणा होत नसल्याने अखेर मंदिराच्या बाहेर दर्शनी भागात ड्रेस कोड बाबतच्या सूचनांचा फलक लावण्याची वेळ आमच्यावर आल्याचं सोमण यांनी सांगितलं. दक्षिण भारतात प्रत्येक मंदिरात जाताना लुंगी घालावी लागते. आम्ही निदान काय घालावं याची सक्ती करत नाही, परंतु किमान सभ्य कपडे घालावेत, इतकीच आमची भाविकांकडून अपेक्षा असल्याचं अभय सोमण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

आज राजीनामा द्या अन् उद्या पीएफ काढा; EPFO चे कोणते नियम बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT