Ambernath Crime Saam TV
मुंबई/पुणे

Ambernath Crime : भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत इस्टेट एजंटची हत्या; घटनेनं अंबरनाथमध्ये खळबळ

Crime News : अंबरनाथमध्ये इस्टेट एजंटची निर्घृण हत्या; शिवमंदिर रोडवर भररस्त्यात धारदार हत्याराने वार

Ruchika Jadhav

अंबरनाथमध्ये इस्टेट एजंटची भररस्त्यात निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे. संजय पाटील असं हत्या झालेल्या इसमाचं नाव असून ते अंबरनाथ गावात वास्तव्याला होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास अंबरनाथ पूर्वेतील मेफ्लॉवर गार्डनर समोर त्यांच्यावर भर रस्त्यात अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने वार केले. यामध्ये त्यांच्या छातीत आणि पोटात जीवघेणे वार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात त्यांचा मृतदेह नेण्यात आला.

तेथून उत्तरीय तपासणी आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला. त्यांची हत्या प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे. ही घटना घडल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.

पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनीही घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देत या प्रकरणाची माहिती घेतली. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. मात्र कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

दरम्यान, अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिन्याभरात झालेली ही दुसरी हत्या असून आता तर थेट भररस्त्यात हत्या झाल्यानं शिवाजीनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT