Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Ambernath Crime: बायको सोडून गेलेल्या मुलाला बाप मारायचा सतत टोमणे; रागाच्या भरात मुलाने बापाचा काटाच काढला

Ambarnath Crime News: बापाकडून होणारा हा मानसिक त्रास प्रकाशला असह्य होत होता.

अजय दुधाणे

Ambernath News : बायको सोडून गेल्यानंतर टोमणे मारणाऱ्या बापाची मुलाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ शहरात घडला आहे. बापाकडून मारले जाणारे टोमणे आणि मानसिक त्रास याला वैतागून मुलानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. (Ambarnath Latest News)

अंबरनाथच्या (Ambernath) दत्तकुटीर भागात देविदास किसन सूर्यवंशी (६०) हे परिवारासह वास्तव्याला होते. त्यांचा मुलगा प्रकाश सूर्यवंशी हा रिक्षा चालवण्याचं काम करतो. प्रकाश हा विवाहित असून त्याला तीन मुलं आहेत. मात्र त्याची बायको (Wife) काही दिवसांपूर्वी त्याला सोडून निघून गेली.

याच कारणावरून देविदास हे त्यांचा मुलगा प्रकाश याला सतत टोमणे मारत आणि सतत घालून पाडून बोलत होते. बापाकडून होणारा हा मानसिक त्रास प्रकाशला असह्य होत होता. त्यातच रविवारी रात्री प्रकाश हा घरी आल्यानंतर जेवण करण्यासाठी बसला होता.

यावेळी पुन्हा एकदा देविदास यांनी त्याला घालून पाडून बोलायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशने लाकडी फळीने देविदास सूर्यवंशी यांना मारहाण केली.

या मारहाणीत देविदास सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत देविदास सूर्यवंशी यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तर काही वेळाने प्रकाश याला सुद्धा अंबरनाथ शहरातूनच ताब्यात घेण्यात आलं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

Madhuri Dixit Birthday: माधुरीला अभिनय नाही 'या' क्षेत्रात करिअर करायचं होतं; अशी बनली बॉलिवूडची 'धक-धक गर्ल'

बंगळूरू ते हैदराबाद प्रवास फक्त २ तासांत, तर चेन्नईला पोचाल ७५ मिनिटात; हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

SCROLL FOR NEXT