अंबरनाथ: रशियाला फिरायला गेलेली ७ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटीव्ह... SaamTV
मुंबई/पुणे

अंबरनाथ: रशियाला फिरायला गेलेली ७ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटीव्ह...

कुटुंबासह परदेशात जाऊन आलेली अंबरनाथमधील ७ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ही मुलगी आई-वडिलांसह रशियात फिरण्यासाठी गेली होती.

अजय दुधाणे

अंबरनाथ: जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने (Omicron Variant) चिंता वाढवली असताना अंबरनाथमधून एक चिंतेची बातमी समोर येतेय. कुटुंबासह परदेशात जाऊन आलेली अंबरनाथमधील ७ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळली आहे. ही मुलगी आई-वडिलांसह रशियात (Russia) फिरण्यासाठी गेली होती. २८ नोव्हेंबरला हे कुटुंब राशियाहून अंबरनाथला परतलं, त्यानंतर काही दिवसांत मुलीला त्रास होऊ लागल्यानं टेस्ट केली असता आली ही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.

हे देखील पहा -

मुलीच्या वडीलांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून मुलीच्या आईचे टेस्ट रिपोर्ट येणं बाकी आहे. चिंताजनक बाब म्हणजे या मुलीची आई दोन दिवस ऑफिसलाही जाऊन आल्याचं उघड झालं आहे. या मुलीचे नमुने ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी आज लॅबला पाठवणार असल्याची माहिती मिळतेय. सध्या मुलगी आणि तिचे कुटुंबीय घरीच क्वारंटाईन (Quarantine) असून इमारत सील (Seal) करणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT