Ambernath Minor Boy Attack: 16-Year-Old Friend Dies After Bamboo Stick Assault AI Image
मुंबई/पुणे

Ambernath : मैदानात रक्तरंजित थरार! चिडवल्याचा राग डोक्यात गेला, मित्राकडून १६ वर्षीय मुलाची हत्या

Ambernath News : अंबरनाथमध्ये चिडवल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षीय मुलाची मित्रानेच केली हत्या. पोलिसांनी १४ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं आहे.

Alisha Khedekar

  • अंबरनाथमध्ये जुना भेंडीपाडा परिसरातील फुकट बस्तीमध्ये भयंकर घडलं

  • दोन अल्पवयीन मित्रांमध्ये झालेल्या वादातून हत्या

  • गंभीर दुखापत झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

  • पोलीस तपास सुरु

अजय दुधाणे - अंबरनाथ

अंबरनाथमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुना भेंडीपाडा परिसरातील फुकट बस्तीमध्ये एकमेकांना चिडवल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन अल्पवयीन मित्रांमध्ये झालेल्या वादाने गंभीर वळण घेतलं. वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर १४ वर्षीय मुलाने आपल्या १६ वर्षीय मित्राच्या डोक्यात बांबूच्या काठीने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव शोएब सिद्दिकी असं आहे. शोएब हा अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील फुकट बस्ती परिसरात राहत होता. आरोपी मुलगा आणि शोएब हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. दोघेही नेहमी एकत्र खेळत असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी दोघे जुना भेंडीपाडा परिसरातील एका छोट्या मैदानावर खेळत होते. खेळत असताना एकमेकांना चिडवण्यावरून त्यांच्यात वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली.

याचदरम्यान शोएबच्या मित्राने जवळ असलेल्या बांबूच्या काठीने शोएबच्या डोक्यात जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात शोएबच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घटनेनंतर आरोपी मुलगा घटनास्थळावरून पळून गेला. जखमी शोएबला तातडीने उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं.

घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी संबंधित १४ वर्षीय मुलाला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, त्यानंतर बालसुधारगृहात रवानगी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा इतका गंभीर परिणाम झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साखरेचे दर वाढताच सर्वसामान्यांची आवडती जिलेबी पोहोचली 160 रुपये किलोवर

Corporator Harassment Case: नगरसेविकेचा भररस्त्यात विनयभंग, रस्त्यात अडवून अश्लील हावभाव अन् शिवीगाळ; कोल्हापुरातील संपातजनक घटना

Railway Luggage Booking : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता घरबसल्या बुक करा Extra Luggage; भाडे किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rock Salt vs Black Salt: सैंधव मीठ की साधे मीठ? रोजच्या आहारात कोणते मीठ वापरावे? दोन्हींमध्ये फरक काय? जाणून घ्या

Weight Loss : झपाट्याने वजन कमी करायचंय? मग रोज खा 'हे' १ फळ, 'ही' चूक मात्र टाळा

SCROLL FOR NEXT