नाराळाच्या करवंटीवर साकारली अमरजाई देवी, पाहा व्हिडिओ दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

नाराळाच्या करवंटीवर साकारली अमरजाई देवी, पाहा व्हिडिओ

नवरात्रात आपल्या देवीची सेवा करण्यासाठी आपल्याकडून काय योगदान मिळते

दिलीप कांबळे

मावळ : नवरात्रात आपल्या देवीची सेवा करण्यासाठी आपल्याकडून काय योगदान मिळते, अशी प्रत्येक गृहिणीची नागरिकांची इच्छा असते. काही महिला नऊ दिवसात वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करून, योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात, तर काही देवीच्या मंदिरात नऊ लहान मुलींना सजवून देवीचे रूप साकार करण्याचा प्रयत्न करत असतात. काही कलाकार रांगोळीतून देवीचे रूपे सादर करण्याचा प्रयत्न करत असतात.

हे देखील पहा-

अशाच तळेगाव दाभाडे येथील अनुजा जोशी यांनी सुपारीवर गणपती पेंटिंग करून साकारला होता. तसेच आज त्यांनी नारळाच्या करवंटीवर मावळातील जुना पुणे मुंबई महामार्गावर स्वयंभू प्रकट झालेली शेलारवाडी गावची ग्रामदेवता अमरजाई देवीची हुबेहूब प्रतिमा साकारली आहे. सुंदर आकर्षक अशी प्रतिमा पाहून साक्षात देवी आपल्या समोर प्रकट झाल्याचा भास होतो. पर्यावरणपूरक ही कला साकारत असताना तब्बल ४ तासाचा अवधी लागला आहे.

अमरजाई मंदिरातील मुख्य गाभारा मंदिरात बसून ही कलाकारी करण्यात आली आहे. यावेळी महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती. नारळाची देवी प्रतिमा करवंटी मंदिराचे मुख्य पुजारी वसंत जोशी यांना अर्पण करण्यात आली आहे. नवरात्रीचे नऊ रंग वापरून खऱ्या अर्थाने देवीच्या नवरात्रोत्सव अमर जाई देवीचं चित्र रेखाटून आपण धन्य झालो अशी भावना अनुज यांनी व्यक्त केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा शुल्क माफ; फडणवीस सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT