Zeeshan Siddique Saam Tv
मुंबई/पुणे

Zeeshan Siddique : झिशानही टार्गेट? सिद्दीकी पिता-पुत्रांना संपवण्याचा प्लॅन, मारेकऱ्यांच्या चौकशीतून गौप्यस्फोट

Baba Siddique Death Case: माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आरोपीनं मोठा खुलासा केलाय...बाबा सिद्दीकी यांच्याबरोबरच मुलगा आमदार झिशान सिद्दिकींना मारण्याची सुपारी दिल्याचं समोर आलंय.मारेकऱ्यांनी काय धक्कादायक गौप्यस्फोट केलेत ते जाणून घेऊ...

Tanmay Tillu

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय क्षेत्रचं नाही तर बॉलिवूडमध्येही खळबळ उडालीये. आता या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येतायत. त्यानुसार आरोपीनं एक मोठा खुलासा केलाय.

फक्त बाबा सिद्दीकीच नाही तर झिशान सिद्दीकींनाही मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आलंय. त्यामुळे आमदार झिशान सिद्दीकी हे देखील बिश्नोई टोळीच्या रडारवर होते हे स्पष्ट झाले आहे. बाब सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिस चौकशीदरम्यान, अनेक धक्कादायक खुलासे होतायत.

मारेकऱ्यांचा गौप्यस्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांना बाबा सिद्दीकींसह झिशानलाही मारायचे होते. यासाठी मारेकऱ्यांना सुपारी देण्यात आली होती. सिद्दीकी पिता-पुत्राला सोबत मारण्याचा प्लॅन होता. जो समोर दिसेल त्याला आधी मारण्याच्या सूचनाहे मारेकऱ्यांना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हरियाणाच्या गुरमेल बलजीत सिंग आणि उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यपला अटक केली. गुरमेल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

मारेकऱ्यांनी कसा डाव साधला?

हल्लेखोर सिद्दीकी पिता-पुत्रावर काही दिवसांपासून पाळत ठेवून होते. तिन्ही आरोपी कुर्ल्यात भाड्यानं राहायचे. रोज रिक्षानं वांद्र्यात झिशान यांच्या ऑफिसपर्यंत जात होते. आरोपींकडून सिद्दीकी पिता-पुत्राशी संबंधित ठिकाणे, घर, कार्यालय आणि कार्यक्रमांवर लक्ष होते.

बाबा सिदीक्कींवर झालेल्या हल्ल्यानं खळबळ माजली आहेच. मात्र मारेकऱ्यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागलंय. त्यातून आणखी काय काय खुलासे मारेकरी करणार आणि हत्येचं कारण काय समोर येणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

SCROLL FOR NEXT