Akola EX MLA Gopikishan Bajoria Joins Shinde Group जयेश गावंडे
मुंबई/पुणे

Akola : अकोल्यात शिवसेनेला धक्का! सेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया समर्थकांसह शिंदे गटात सामील

Akola EX MLA Gopikishan Bajoria Joins Shinde Group : गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह त्यांचे पुत्र तथा विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत.

अॅड. जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील बाजोरिया गटाने (Gopikishan Bajoria) अखेर शिंदे गटात आज, गुरूवारी प्रवेश केला आहे. बाजोरिया पिता-पुत्रांसह शिवसेनेचे (Shivsena) पंचवीसजण एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्याने अकोल्यात (Akola) शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अकोल्याचे माजी विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह त्यांचे पुत्र तथा विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. (Akola Political News)

हे देखील पाहा -

गेल्या अनेक दिवसांपासून विधान परिषदेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आज बाजोरियांनी शिंदे गटात अधिकृतपणे प्रवेश घेतला. शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात हा प्रवेश झाला. दरम्यान, त्यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया समोर येत आहे. अकोल्यातून शिवसेनेसह युवासेनेला धक्का बसला आहे. आज मुंबई येथे अकोल्यातील माजी आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभगी झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विधानपरिषदेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, विद्यमान विप्लव बाजोरिया, उपशहर प्रमुख, युवा सेनेचे अकोला जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, माजी नगरसेवकांसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडणार असल्याची शक्यता आहे. अकोल्यात सुरुवातीपासून जिल्हाप्रमुख तथा शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया, माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे गट असल्याची चर्चा नेहमीच रंगली होती. पण बाजोरीया गटाकडून अनेकदा विद्यमान आमदार नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT