ajit pawar on sujay vikhe patil Saam TV
मुंबई/पुणे

पोलीस माहिती घेण्यास कमी पडले हे निर्विवाद सत्य - अजित पवार

मिडीयाला आंदोलन आहे कळलं मग पोलीस यंत्रणेला कसे कळलं नाही आंदोलन आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी काल एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून नेतेमंडळी या प्रकारावर प्रतिक्रिया देत आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी या सर्व घटनेमध्ये पोलिसांचं देखील अपयश असल्याचं ठामपणे सांगितलं. मिडीयाला आंदोलन आहे कळलं मग पोलीस यंत्रणेला कसे कळलं नाही आंदोलन आहे? याची चौकशी करणार असल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं.

पुढे अजित पवार म्हणाले की, ला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळण्यात आला, मिठाई वाटली, सेलिब्रेशन केलं हे सगळं झाल्यानंतर सिल्व्हर ओकवर जाण्याचं कोणी धारीष्ट्य केलं. कोणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती. एसटी कर्मचाऱ्यांना कोणीतरी भडकवलं. हे षड्यंत्र कुणी केलं हे शोधून काढायला पाहिजे होत. शरद पवार यांनी एसटीसाठी अनेक निर्णय घेतले आहे मग त्यांच्यावर रोष का असा सवाल देखील अजित पवार यांनी यावेळी केला आहे.

अजित पवार म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली. त्यामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. पोलीस यंत्रणा याचा तपास करुन यामागे कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध घेतील.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT