Ajit Pawar, Naresh Mhaske, Supriya Sule, Rohit Pawar, Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Naresh Mhaske Statement : पवार कुटुंब समजायला... गद्दारीच्या टीकेवर काका पुतण्यांसह सुळेंचे उत्तर (पाहा व्हिडिओ)

राेहित पवार यांचा एमसीए निवडणुकीत पराभव व्हावा असे अजित पवारांना वाटत हाेते असा दावा म्हस्केंनी केली.

Prachee kulkarni

- Sachin Jadhav

Ajit Pawar News : ज्यांनी पक्षात आणि घरात गद्दारी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमच्या विषयी बाेलू नये अशी टिप्पणी करणा-या ठाण्याचे माजी महापाैर नरेश म्हस्के (naresh mhaske) यांच्या विधानाला आम्ही फारसे महत्त्व देत नाहीत असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar), राेहित पवार (rohit pawar) आणि सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी नमूद केले. पवार कुटुंबिय काय आहे हे संपुर्ण महाराष्ट्राला माहित आहे असे अजित पवारांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

म्हस्के यांच्या विधानावर खासदार सुप्रिया सुळेंनी पवार यांचे नाव घेतल्याशिवाय ज्यांचे राजकारण पूर्ण होत नाही त्यांनी बिनदास्त बोलावं अशी टिप्पणी केली. जे बाेलताहेत ते एमसीएचे मतदार आहेत का असेही सुळेंनी नमूद केले.

म्हस्केंना पवार कुटुंब कळणार नाही - राेहित पवार

म्हस्के यांच्या विधानावर आमदार राेहित पवार म्हणाले त्यांना कधी भेटलाे नाही. ते दादांवर, आव्हाडांवर बाेलले. मी तर साधा कार्यकर्ता आहे. परंतु त्यांना एकच सांगताे क्रिकेट आणि पवार कुटुंब त्यांना कधीही कळणार नाही अशी टिप्पणी आमदार राेहित पवार यांनी केली.

आलतू फालतू स्टेटमेंटला महत्व देत नाही - अजित पवार

अजित पवार म्हणाले मी असल्या आलतू फालतू स्टेटमेंटला महत्व देत नाही. आम्ही कधीच घरात अशा पद्धतीने वागत नाही. संपुर्ण महाराष्ट्राला माझे वागणे माहित आहे. जे मी बाेलताे तेच करताे. राेहित हा माझा पुतण्या आहे. माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळे माझ्याकडून अशा घटना घडणार नाहीत हे सर्वजण जाणतात.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT