Ajit Pawar  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar on Manoj Jarange: अजित पवारांचं मनोज जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले...

Ajit Pawar News: 'अजित पवार यांना नोंदी सापडलेल्या माहीत नाहीत का? ते महाराष्ट्रातच राहतात का? असा तिरकस सवाल करत जरांगे यांनी अजित पवारांना इशारा दिला होता. त्यानंतर अजित पवारांनी नाव न घेता जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

Ajit Pawar News:

मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात चांगलीच जुंपल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी अजित पवारांना इशारा दिला होता. 'अजित पवार यांना नोंदी सापडलेल्या माहीत नाहीत का? ते महाराष्ट्रातच राहतात का? असा तिरकस सवाल करत जरांगे यांनी अजित पवारांना इशारा दिला होता. त्यानंतर अजित पवारांनी नाव न घेता जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

मुंबई अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाध साधला. मनोज जरांगे यांच्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मी काय काम करतो, हे मला माझे माहीत आहे. मला दुसऱ्याने पावती देण्याची गरज नाही. मी गेली ३२ वर्षे काम कत आहे. मी सर्व धर्माची कामे करत असतो'. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीबाबत अजित पवार म्हणाले, ' मला त्याबाबत काही माहीत नाही. मी माझे काम करत असतो. मी कामाला महत्त्व देतो, अशा बारीक गोष्टीवर मी लक्ष देत नाही. राज्यातील विकासावर लक्ष ठेवतो'.

बारामती बस डेपोवर अजित पवार काय म्हणाले?

'आपण टप्याटप्याने नवीन बसेस यावर्षी देखील घेत आहेत. या करिता बजेटमध्ये तरतुदी केली आहे. बिओटी तत्वावरील बसमुळे बस डेपोचा विकास झाला, हे बाकीच्या प्रतिनिधी ठरवावं, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT