Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची माझी पात्रता नाही: अजित पवार

आज संध्याकाळी 6 वाजता अजित पावर मंत्री जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसोबत बंडाचे निशाण फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं आहे. शिंदे गट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेना नेत्यांनी बंड सुरूच ठेवलं आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता, शरद पवार यांनी एखाद्या विषयावर काही वक्तव्य केल्यावर त्यावर बोलायची माझी लायकी नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्याबाहेर काय घडतं त्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल बोलतील. माझा संबंध महाराष्ट्रापुरता आहे, असंही अजित पवार म्हणाले.

हे देखील पाहा -

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्री यांच्यासोबत उभे राहण्यावर ठाम आहे, माविआ सरकारकडे बहुमत आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. ते मुंबईत बोलत होते. तसेच आज संध्याकाळी ६ वाजता मंत्री जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी स्प्ष्ट केले. दरम्यान विधानपरिषदेतील काही निर्णय असतील तर, उपसभापती निर्णय घेतात, तर विधानसभेतील काही निर्णय असतील तर, ते विधानसभा प्रभारी अध्यक्ष घेतील, असे पवार म्हणाले. बंडखोरी हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे. ते आमदार माझ्या पक्षातील नाहीत, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांभाळण्याच्या नादात शिवसेनेच्या आमदारांकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष झाले का असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, असे अजिबात नाही. सुरुवातीचे काही दिवस मुख्यमंत्र्यांनी वर्षावरून काम पाहिले. त्यावेळी कामामध्ये कुठलाही अडथळा आला नाही. आताही ते तेथून कारभार करत असतील तर काहीच अडचण नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘पंचनामे कशाला करता?’ म्हणणाऱ्यांनी वडिलांकडून दुष्काळाचे नियम समजून घ्यावेत; जयकुमार गोरे यांचा प्रणिती शिंदेंना टोला

काँग्रेसच्या नगरसेवकाचा घरात मृतदेह; आमदारांसह नेते-कार्यकर्ते दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

SCROLL FOR NEXT