सिडको कार्यालयात अधिकारांच्या खरडपट्टीसाठी अजित पवारांची बैठक, सेना काँग्रेस नाराज? Saam Tv
मुंबई/पुणे

सिडको कार्यालयात अधिकारांच्या खरडपट्टीसाठी अजित पवारांची बैठक, सेना काँग्रेस नाराज?

सेना आणि काँग्रेस नेत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे.

विकास मिरगणे

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar हे आज बेलापूर Belapur येथील सिडको Cidco मुख्यालयाला भेट देणार असून गेली अनेक वर्षे प्रलंबित प्रश्नांबद्दल सिडको प्रशासनाला जाब विचारणार आहेत. मंत्रालयात बैठक लावल्यानंतर काही मोजके अधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीतील निर्णयांचे इतिवृत्तांत तयार होणारा विलंब आणि त्यामुळे अधिकाऱ्यांचा चालढकलपणावर उतारा म्हणून पवार यांनी सिडको मुख्यालयातच बैठक आयोजित केली आहे.

त्यामुळे या महामंडळाच्या कामकाजात शिवसेनेव्यतिरिक्त इतर पक्षाच्या मंत्र्यांनी ढवळाढवळ करणे शिवसेनेला रुजलेले नाही. त्यामुळे नगरविकास मंत्री नाराज आहेत असे समजते या बैठकीला सेना आणि काँग्रेस यांना निमंत्रण देण्यात आले नाही फक्त अजित पवार आणि राष्ट्रवादी प्रमुख नेते बैठकीला उपस्थिती राहणार आहेत त्यामुळे सेना आणि काँग्रेस नेत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे.

हे देखील पहा -

या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यासंदर्भात येणारी अडचण, सिडको व खासगी इमारतींच्या पुनर्विकासासाठी निर्माण झालेला दुजाभाव, गृहनिर्माण सोसायटींचे कनेवेन्स डिड, पालिकेला हस्तांतर करण्यात येणारे सार्वजनिक भूखंड या प्रमुख प्रश्नांवर पवार आदेश देण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई बरोबरच आता नैना क्षेत्राचा सिडको विकास करीत असून राज्यात विमानतळ उभारणारे हे एकमेव प्राधिकरण आहे. त्यामुळे या महामंडळाकडे काही प्रश्न अनेक वर्षे प्रंलबित असून त्यावर निर्णय घेतला जात नाही. नगरविकास विभागाच्या अंतर्गत येणारे हे महामंडळ महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडे असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या आधिपत्याखाली त्याचे कामकाज चालत आहे.सिडको हे महामंडळ एकतर मुख्यमंत्री किंवा नगरविकास मंत्री यांच्या आधिपत्याखाली चालत असल्याचे दिसून येते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT