Ajit Pawar News Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar : मी चुकीचं बोललो नाही, माझा राजीनामा मागण्यापेक्षा महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर बोला, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत विधान केलं होतं. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते, असं अजित पवारांनी ठामपणे सांगितलं होतं.

त्यांच्या या विधानावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

मी काही चुकीचं बोललो नाही. महाराजांचा मी कुठेही अपमान केला नाही. उलट महापुरुषांबद्दल जे बेताल वक्तव्य करत आहेत, त्यांच्याविरोधात काय कारवाई केली याबाबत कोणीच काही बोलत नाहीत, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं.

मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधी पक्षनेते हे पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

स्वराज्य रक्षक ही उपाधी सर्वसमावेशक आहे. काही जण संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात, काही जन स्वतः धर्मवीर लावतात. काहींचे चित्रपट निघाले, भाग दोन पण येणार आहे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. संभाजी महाराज होणार नाही. दुसरे स्वराज्य रक्षक कोणी असू शकणार नाही. मात्र प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT