NCP Leaders  Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar and Leaders Meet Sharad Pawar : शरद पवार आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या भेटीत नेमकं काय झालं?, प्रफुल्ल पटेल म्हणाले...

Political News : शरद पवार आमचे सर्वांचे आदरनीय नेते शरद पवार म्हणून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं की, शरद पवार आमचे सर्वांचे आदरनीय नेते शरद पवार म्हणून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो.

वेळ न मागता आम्ही येथे आलो. आम्हाला समजलं होतं की ते येथे आहेत. त्यामुळे संधी साधून आम्ही सगळे येथे आलो. आम्ही पवार साहेबांकडे आशिर्वाद मागितले. पक्ष एकसंध कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी विचार करावा यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली आहे, असं प्रुफल्ल पटेल यांनी म्हटलं. (Political News)

पवार साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे आमचं मत ऐकून घेतलं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. उद्यापासून आम्ही आपापल्या विभागाची जबाबादारी विधानसभेमध्ये पार पाडू, असंही प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

शरद पवारांच्या भेटीआधी बैठक

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाण्यापूर्वी देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी  मार्गदर्शन केले. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार सर्व मंत्र्यांना घेऊन वाय बी चव्हाण सेंटरला दाखल झाले आहेत. या सर्व मंत्र्यांना शरद पवाराचा आशिर्वाद मिळणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष

Sambhajinagar : बनावट विद्यार्थी दाखवून लाटले साडेसहा कोटी रुपये; चार महाविद्यालयांकडून करण्यात आली फसवणूक

Rava Ladoo Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा रवा लाडू घरच्याघरी कसा बनवायचा?

Peplum kurti with plazo: रक्षाबंधनला ट्राय करा स्टाईल आणि कम्फर्टचा बेस्ट कॉम्बो असलेला पेप्लम कुर्ती आणि पलाझो

Nagpur Zoo Shocking : १८ फुटांची लोखंडी जाळी ओलांडून वाघाच्या पिंजऱ्यात शिरला तरुण, पुढे जे घडलं ते भयंकरच...पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT