Air Hostess Killed Case  Saam TV
मुंबई/पुणे

Air Hostess Killed Case : २३ वर्षीय एअर हॉस्टेसच्या हत्येचं कारण आलं समोर, CCTVमुळे आरोपी क्लीनर पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Crime News : पोलिसांनी इमारतीत सफाईचं काम करणाऱ्या विक्रम आटवाल याला अटक केली.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai News :

मुंबईतील पवई परिसरात २३ वर्षीय एअर हॉस्टेस रुपल ओगरेची हत्या झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. मुंबई पोलिसांना अवघ्या काही तासात या घटनेचा उलगडा केला आणि इमारतीत सफाईचं काम करणाऱ्या विक्रम आटवाल याला अटक केली.

रुपल बहीण आणि मित्रासोबत मरोळ येथील एन जी कॉम्प्लेक्स येथे राहत होती. मात्र दोघेही कामानिमित्त बाहेर असताना ही दुर्दैवी घटना घडली. पोलीस तपासात हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

लैंगिक अत्याचाराच प्रयत्न

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रुपलने क्लिनिंगसाठी आटवालला घरी बोलावले होते. त्यावेळी रुपल घरात एकटी असल्याने आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र रुपलने विरोध केल्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुपलने विरोध केल्याने आटवालने चाकून तिच्यावर वार करत तिची हत्या केली.  (Crime News)

सीसीटीव्ही फुटेज ठरलं महत्त्वाचं

टाईम ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी तपास सुरु केला त्यावेळी त्यांनी इमारतीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामुळे आरोपी इमारतीत सकाळी ११.३० वाजता गेला होता. त्यानंतर दुपारी बऱ्याच वेळानंतर बाहेर पडला. दरम्यान तो कंपनीच्या गणवेशात आता गेला आणि येताना दुसऱ्या कपड्यांमध्ये बाहेर पडाला. त्यामुळे पोलिसांचा संशय खरा ठरला. दरम्यान गुन्हा केल्यानंतर आरोपीने त्याच्या गणवेशातील रक्ताचे डाग धुतले. कपडे बदलले आणि इमारतीतून बाहेर पडला, हे पोलीस तपासात उघड झालं.

पोलिसांनी किमान 40 लोकांची चौकशी केल्यानंतर आटवालचा शोध घेतला. आरोपीच्या मानेवर आणि हातावर ताज्या जखमांच्या खुणा आढळल्यानंतर त्याच्या गुन्हातील सहभागाची पुष्टी झाली. पोलिसांना त्याची चौकशी केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली आहे. पोलीस चौकशीत त्याच्यावर आधीही कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : उत्साहात दिवस जाईल, ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Rain Alert : पुढील ८ ते ४८ तासांत कोकण-गोव्यासह १९ राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT