NACO Saam TV
मुंबई/पुणे

AIDS Control Programme : राज्यात निरोध टंचाई, एड्स नियंत्रण मोहिमेला गतिरोधक; ३.२ कोटींची मागणी, पुरवठा निम्मा सुद्धा नाही!

AIDS Control Programme : महाराष्ट्रासह आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये मागील सात महिन्यांहून अधिक काळ एचआयव्ही /एड्स कार्यक्रमांना मोफत कंडोमच्या पुरवठ्यात गंभीर तुटवडा आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News :

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) च्या एड्स नियंत्रण कार्यक्रमाचं मोठं अपयश समोर आलं आहे. NACO कडून होणाऱ्या कंडोम खरेदीत मोठा व्यत्यय आल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्रासह आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये मागील सात महिन्यांहून अधिक काळ एचआयव्ही /एड्स कार्यक्रमांना मोफत कंडोमच्या पुरवठ्यात गंभीर तुटवडा आला आहे.

डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामुळे NACO ने राज्यांना कंडोमची स्वतःची खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्राला वर्षाला 3.2 कोटी कंडोमची गरज भासत आहे. कंडोमचा शेवटचा पुरवठा मे महिन्यात झाला होता. जवळपास 80 लाख कंडोमची तिमाही गरज असताना, वितरित केलेले कंडोम 35 लाख आधीच संपले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक NGO आणि संस्थांनी TOI ला सांगितले की, त्यांच्याकडी कंडोमचा साठा देखील पूर्णपणे संपला आहे. ज्यात त्यांनी अंतर्गत निधी वापरून आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) द्वारे खरेदी केलेल्या कंडोमचाही समावेश आहे. एचआयव्ही/एड्स नियंत्रण कार्यक्रमाद्वारे हाय रिस्क असलेल्या गटांना कंडोम पुरवला जातो. ज्यासमध्ये सेक्स वर्कर्सचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. उर्वरित राज्याच्या तुलनेत मुंबईत कंडोमची उपलब्धता चांगली आहे. (Latest News Update)

राज्यात 12 लाखांहून अधिक लोक एचआयव्ही संसर्गाच्या हाय रिस्क श्रेणीमध्ये येतात. एका प्र्क्रियेद्वारे NACO सर्व कंडोम खरेदी करते, त्यानंतर ते राज्यांना वितरित केले जातात. तसेच यासंबंधीत काम करणार्‍या NGO आणि CBO यांना दिले जातात. मात्र कंडोमच्या एनजीओंना भीती वाटते की कंडोम टंचाईमुळे एड्स नियंत्रण कार्यक्रमावर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवसातून ४ वेळा नारळपाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Shocking: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ, रात्री व्हिडिओ कॉल करायची अन्...; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT