Ahmednagar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Ahmednagar Crime News: कोचिंग क्लासमधील मुलींवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप; शिक्षिकेसह ८ जणांवर गुन्हा, ४ अटकेत

Ahmednagar Latest News: कोचिंग क्लासमधील मुलींवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप; शिक्षिकेसह ८ जणांवर गुन्हा, ४ अटकेत

साम टिव्ही ब्युरो

Ahmednagar Crime News: अहमदनगर राहुरी येथे शिक्षिकेकडून कोचिंग क्लासला येणाऱ्या अल्पवयीन मुलींवर धर्मांतरासाठी दबाव टाकला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी काही मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षिकेसह चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

राहुरी तालुक्यातील उंबरे येथील घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. यापूर्वी श्रीरामपूरमध्ये घडलेल्या घटनांमध्ये डबल मोक्का लावण्यात आला असून लव जिहादच्या बाबतीत जिल्हा पोलीस प्रमुखांना सक्त सूचना दिल्या आहेत.  (Latest Marathi News)

ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना घडतील तिथल्या पोलीस अधिकाऱ्यावर देखील कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस तत्परतेने कारवाई करताय मात्र, अशा घटना घडत असतील तर नागरिकांनी स्वतः पुढे आले पाहिजे, असे अवाहन विखे पाटलांनी केले आहे. तसेच उंबरे येथे घडलेल्या प्रकरणात कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे.

या प्रकरणातील कोचिंग क्लासच्या शिक्षिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा आधिक तपास सुरू असून आणखी कुणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनजंय जाधव यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Genelia Deshmukh Photos: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

SCROLL FOR NEXT