ST Strike: न्यायालयाच्या सुनावणीनंतर अनिल परबांनी ST कर्मचाऱ्यांना केलं 'हे' आवाहन Saam TV
मुंबई/पुणे

ST Strike: न्यायालयाच्या सुनावणीनंतर अनिल परबांनी ST कर्मचाऱ्यांना केलं 'हे' आवाहन

उच्च न्यायालयासमोर आज समितीचा अहवाल सादर करण्यात आला असून न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीची तारीख दिली आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ST चे राज्यशासनामध्ये विलिनीकरण व्हावे यासाठी वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदावर्ते यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाकडून या प्रकरणाची सुनावनी शुक्रवारी २५ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, माननीय उच्च न्यायालयाने (High Court) जी समिती नेमली होती या समितीने अहवाल न्यायालयाला सादर केला आहे. उच्च न्यायालयासमोर आज समितीचा अहवाल सादर करण्यात आला असून न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ची तारीख दिली आहे. मात्र याबाबतचा अहवाल मी वाचलेला नाही तसंच समितीच्या निर्णयाचे निकालपत्र कर्मचाऱ्यांच्या वकिलांना देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, कोरोना (Corona) काळात मृत्यू पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees) आम्ही 50 लाख रुपये दिले आहेत. जे नियमात बसणार नव्हते त्यांना देखील आम्ही 5 लाख रुपये दिले आहेत पुन्हा एकदा ST कर्मचाऱ्यांना माझं आवाहन आहे की, 'कामावर तुम्ही या; आम्ही कामावर तुम्हांला घेण्यासाठी तयार आहोत. लोकांचे, विदयार्थ्यांचे हाल थांबवा आणि कामावर या हे आवाहन आम्ही वारंवार करत आहोत. तसंच कामावर असलेल्या एसटी कामगारांचे पगार कापले जाणार आहेत अश्या अफवा कोणी पसरू नये असही ते आज उच्च न्यायालयाच्या सुनावनी नंतर बोलताना म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT