Rohit Pawar On Sanjay Shirsat Saam Tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar: 'संजय शिरसाट यांच्या डोक्यावर परिणाम झालाय', ईडी चौकशीनंतर रोहित पवार आक्रमक

Rohit Pawar On Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांच्या डोक्यावर थोड्या परिणाम झाला आहे'', असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार असं म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> आवेश तांदळे

Rohit Pawar On Sanjay Shirsat:

''काही नेते राजकीय आरोप माझ्यावर करत आहेत. संभाजीनगर येथील काही आमदार चुकीची माहिती सांगत आहेत. ते खोटी माहिती देत आहे. जर असेच खोटी माहिती देत असेल तर त्यांच्यावर वकिलांमार्फत कारवाई करणार. संजय शिरसाट यांच्या डोक्यावर थोड्या परिणाम झाला आहे'', असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार असं म्हणाले आहेत. रोहित पवार यांची आज तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी शरद पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''आम्ही बाप्पाचे वय कधी काढत नसतो. मी शरद पवार यांचा नातू म्हणून मला अभिमान आहे. ही केस एक सामूहिक केस आहे. ठराविक लोकांवर कारवाई होत आहे. मी एकटा या सर्वांसाठी मी लढेल.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहित पवार म्हणाले, ''माझ्या नावाने आजच्या तारखेला समन्स आला होता. ईडीला मी विनंती केली होती की, 22 तारीख घ्या. पण ण त्यांनी काही उत्तर दिले नाही. त्यामुळे मी आज 10.30 तिथे गेलो.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले आहेत की, ''आपली लढाई सुरुच राहणार आहे. मी मनापासून सर्वांचं आणि शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर झुकायला हरकत नाही. पण काही झालं तरी त्यांच्यासमोर झुकणार नाही.''

रोहित पवार पुढे म्हणाले की, 'कार्यकर्ता अडचणीत असताना पवारसाहेब 10 तास बसले होते. यावरून पवार साहेब युवकांना संधी देतात. बाप माणूस म्हणून पाठी उभे राहतात, पण पळणाऱ्यांच्या पाठी नाही. लढणाऱ्याच्या पाठी राहतात.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

SCROLL FOR NEXT