Sex Toys News Pune Saam TV
मुंबई/पुणे

सेक्स टॉइजच्या 'भयंकर खेळात' अडकताहेत अल्पवयीन मुले, पुण्यासाठी ही धोक्याची घंटा आहे का?

Pune Sex Toy News: केवळ धक्कादायकच नाही, तर आपल्या लाडक्या मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवणाऱ्या पालकांसाठीही ही बातमी चिंताजनक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव, पुणे

Pune Sex Toy News: पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. खरं तर पुणे हे महाराष्ट्राचंच नव्हे तर, देशातील महत्त्वाचं शिक्षण केंद्र आहे. याच ठिकाणी देशभरातून युवक शिक्षण घेऊन आपले भविष्य घडविण्यासाठी येतात. मात्र आता या शिक्षणाच्या माहेरघराला आणि सांस्कृतिक नगरीला वासनेची चटक लागली आहे का असा गंभीर प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. याचं कारण म्हणजे ही बातमी... केवळ धक्कादायकच नाही, तर आपल्या लाडक्या मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवणाऱ्या पालकांसाठीही चिंताजनक आहे.

पुण्यातील (Pune) एका गोडाऊनमधून १० लाख रुपयांची सेक्स टॉईज जप्त करण्यात आली आहेत. ही सेक्स टॉईज ऑनलाइन विकली जात होती. याप्रकरणी पुण्यात लष्कर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Latest News)

अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून सेक्स टॉईजची खरेदी

पुण्यात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पुण्याच सेक्स टॉईजचा धंदा चालावला जात होता. सर्वात मोठी आणि चिंतेची बाब म्हणजे, हे सेक्स टॉईज मोठ्या संख्येने अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून विकत घेतले जात होते. यामुळे पुण्यातील तरुणांना सेक्स टॉईजचे व्यसन लागले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम 292 आणि 293 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण ऑनलाइन विक्रीत सर्वात मोठ्या संख्येने अल्पवयीन तरुण हे अश्लील खेळणी खरेदी करत होते. या अश्लील खेळणीचा हा धंदा कुठपर्यंत पसरला आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. (Maharashtra News)

सेक्स तंत्र शिबीरानेही मोठा वाद

पुण्यातील कॅम्प भागात सप्टेंबर महिन्यात 'सेक्स तंत्र' शिबिर नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऐन नवरात्रित त्याची पोस्टर्स वगैरे छापून त्यात सहभागी होण्यासाठी पास विक्रीशी संबंधित माहिती देण्यात आली. मात्र सामाजिक आणि महिला संघटनांनी त्याविरोधात मोहीम सुरू केली. यानंतर पुणे पोलिसांवर दबाव वाढला आणि त्यानंतर पोलिसांनी हा कार्यक्रम बंद पाडला. (Pune Crime News)

पुणेकर सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात

दरम्यान पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यात सेक्सटॉर्शनचे एकाच आठवड्यात दोन बळी गेले आहेत. त्यानंतर यंत्रणा सतर्क झाली असून त्यामागचे धक्कादायक वास्तव पुणे सायबर पोलिसांनी समोर आणले आहे. नग्न व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत पैशाची मागणी केल्यामुळे पुण्यातील दोन तरूणांनी एकाच आठवड्यात आत्महत्या केली होती. सेक्सटॉर्शन (Sextortion) या नवीन प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कारण व्हिडीओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून फसवणूक होऊन ते व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT