मुंबईतील जम्बो कोविड केअर सेंटर बंद करण्याचा प्रशासनाचा घाट? Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबईतील जम्बो कोविड केअर सेंटर बंद करण्याचा प्रशासनाचा घाट?

नेस्को कंपनीच्या दबावास बळी पडून सुमारे १० कोटी रूपये खर्चून उभारलेले नेस्को कोविड सेंटरचे फेज २ बंद करण्याच्या तयारीत प्रशासन आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

गोरेगाव, मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अजून साशंकता असताना मुंबई महापालिकेकडून जम्बो कोवीड केअर सेंटर बंद करण्याचा घाट घातला जातोय. नेस्को कंपनीच्या दबावास बळी पडून सुमारे १० कोटी रूपये खर्चून उभारलेले नेस्को कोविड सेंटरचे फेज २ बंद करण्याच्या तयारीत प्रशासन आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (Administration's plan to close Mumbai Jumbo Covid Care Center?)

हे देखील पहा -

राज्य टास्क फोर्सने कोणतेही जम्बो कोवीड केयर सेंटर्स बंद करू नयेत अशा सूचना दिलेल्या असतानाही सुसज्ज असे सेंटर बंद करून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचा पालिकेचा घाट असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी गोरेगाव पूर्व इथल्या नेस्कोतील ई-हॉलमध्ये दीड हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर उभे केलंय. ज्यात १ हजार बेड ऑक्सिजनयुक्त आहेत. जुलै २०२१ मध्ये प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरू असून ७०० बेड हे ऑक्सीजन पाईप लाईनने जोडण्यात आलेत. यासाठी १३ Kl क्षमतेची नवीन टाकी काही दिवसांपूर्वी येथे बसवण्यात आली असून २५० रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजन निर्माण करणारे पाच प्रकल्प बसवून तयार करण्यात आलेत.

नेस्को लिमिटेड कंपनीकडे प्रचंड मोठा एफ हॉल तसंच आणखी दोन हॉल व्यवसायासाठी उपलब्ध आहेत. तरीही फेज २ चे कोविड सेंटरचा हॉलसाठी कंपनीचा आग्रह आहे. नेतेमंडळींचा दबाव आणून मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा निर्णय घेण्यास प्रशासनास भाग पाडले जात असल्याची चर्चा होत आहे.

सध्या अमेरिका, ब्रिटनसह इतर काही देशात कोरोना रूग्ण वाढत आहेत. तसंच देशात १०० टक्के लसीकरण झालेले नाही, १८ वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरण अजून सुरूही झालेले नाही. नुकत्याच शाळा महाविद्यालये सुरू झालेली असून फार मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळं कदाचित मुंबईत रूग्ण वाढू शकतात. हा विचार न करता नेस्कोतील फेज दोनचे कोवीड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला जातोय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT