Sanjay Shirsat On Priyanka Chaturvedi Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Shirsat On Priyanka Chaturvedi: 'आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून चतुर्वेदींना उमेदवारी दिली', संजय शिरसाट यांचं वक्तव्य

Sanjay Shirsat On Aaditya Thackeray : 'आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून चतुर्वेदींना उमेदवारी दिली', संजय शिरसाट यांचं वक्तव्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Shirsat On Priyanka Chaturvedi: ठाकरे गटाच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून चतुर्वेदींना उमेदवारी दिली.'' त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिरसाट म्हणाले आहेत की, काल उद्धव ठाकरे यांची उत्तर भारतीयांची सभा झाली. या सभेत प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेवर भाषण करत होत्या. गद्दारांचं काहीतरी केलं पाहिजे, असं वाक्य त्यांच्या भाषणात होतं. कोण आहेत या चतुर्वेदी, त्यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी असं म्हटलं होतं.

ते म्हणाले, ''आदित्य ठाकरे यांनी त्यांचं (प्रियांका चौतुर्वेदीं) सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. आधी त्या काँग्रेसमध्ये होत्या आणि आता त्या आम्हाला निष्ठेचे धडे देत आहेत.''

शिरसाट पुढे म्हणाले की, ''उद्धव ठाकरे पुन्हा तेच-तेच बोलले. आम्हाला सोडून गेलेले एक एक काय घेऊन जात, सगळ्यांना घेऊन जा असं उद्धव ठाकरे म्हणाले. असं एखाद्या नेत्यानं बोलावं हे खूप विचित्र आहे.'' (Latest Marathi News)

आदित्य ठाकरे यांचा पलटवार

संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनीही पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ''हे जे बोलत आहेत, त्यांना त्यांची किंमत कळली आहे. अशा विचाराची लोक, हे सडके विचाराची लोक आहेत. अशा विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे, असा प्रश्न पडतो. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT