Aditya Thackeray on BMC Budget 2023
Aditya Thackeray on BMC Budget 2023 Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Budget 2023: 'वर्षावरुन कंत्राटदारांनी बनवलेले बजेट...' मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर...

Aditya Thackeray On BMC Budget 2023: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज (शनिवारी) सादर होणार झाले. मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प 52 हजार 619 कोटींचा आहे.

हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

"मुंबई महानगर पालिकेचे आज बजेट आले, बजेटपुर्वी नागरिकांच्या सुचना मागवण्यात आल्या होत्या. त्या आल्या का नाही माहित नाही, मी पत्र लिहून मागणी केली होती कि नवीन प्रोजेक्ट येऊ देऊ नका आजच बजेट बघितला तर यामध्ये नवीन बिग बजेट प्रोजेक्ट नाहीत हा आमचा पहिला विजय," असे आदित्य ठाकरे म्हणाले.

त्याचबरोबर "या बजेटमध्ये आलेले प्रकल्प आमच्याच काळातील असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 50 हजार कोटींच बजेट आहे, नवीन मोठा प्रोजेक्ट कुठं नसताना एवढे पैसे का, मग हा खर्च वाढला कुठं असा सवाल उपस्थित करत हे सामान्य माणसासाठी बजेट नसून वर्षा बंगल्यातून आलेलं बजेट आहे," असा घणाघातही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

दरम्यान, यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांच्या कामावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. "स्कायवॉल्कला 75 कोटी रुपय मंजूर केले आहेत, आयुक्त ठराव आणत आहेत आणि आयुक्तच ठराव मान्य करत आहेत, या अगोदर अशी प्रथा नव्हती असे म्हणत मुंबईत लोकशाही राहिलीय कि नाही," असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girl Death While Dancing: हळदीत नाचता नाचता तरूणीचा मृत्यू; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

Social Media Influencer व्हायचंय? या गोष्टी आत्मसात करा

Girl Child Name: शास्त्रानुसार ठेवा तुमच्या मुलीच नाव, अर्थही जाणून घ्या

PM Narendra Modi in Solapur : स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाहीत, मग मोदींचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांचा हल्लाबोल

Ravindra Dhangekar On PM Modi: पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केली; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT