Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray: राज्यात कंत्राटदार आणि बिल्डरची मज्जा सुरू; प्रदूषणावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Mumbai Pollution: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वायू प्रदूषण वाढलंय. शहरात सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य वाढलंय.

Bharat Jadhav

Aditya Thackeray On Pollution :

मुंबईमध्ये वाढलेल्या प्रदूषणावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. स्मोग टॉवर लावून जनतेला काही फायदा होणार नाही. टँकर घेऊन पाणी मारणं हे हास्यास्पद आहे. पाण्याचे हजार टँकर घ्यायचं म्हणजे कंत्राटदार आला. भाड्याने घ्यायचं म्हणजे कंत्राटदार आला. स्प्रिंकलर्स घ्यायचे म्हणजे कंत्राटदार आला. इथे पण वाटाघाटी आल्या, यावरुन राज्यात कंत्राटदार आणि बिल्डरची मज्जा सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. (Latest News)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वायू प्रदूषण वाढलंय. शहरात सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य वाढलंय. यावर आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता १००० टॅंकर्स लावण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरून आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जी कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, त्यामुळे धूळ येत आहे, त्यामुळे मुंबईकरांना त्रास होत आहे. मुंबईत अनेकांना सर्दी खोकला झालाय. या सरकारने प्रदूषण नियंत्रित राहण्यासाठी काहीच काम केलं नाहीये. मागील सरकार असताना आपण पर्यावरण मंत्री राहिलो होतो, त्यावेळी आम्ही काम खूप केलं. महाविकास आघाडीच्या काळातदेखील कामं होत होती पण तेव्हा, असं काही झालं नाही. आता नियोजन केले जात नाहीये, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.

दरम्यान, मुंबईत विविध ठिकाणे सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये यासाठी पाण्याची फवारणी करत रस्ते स्वच्छ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. रस्ते धुण्यासाठी टॅंकरची संख्या १००० पर्यंत वाढवावी, असेही त्यांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

शनिवारवाड्यात आंदोलन! अनधिकृत पीर काढा, सकल हिंदू समाजाची मागणी|VIDEO

Sadhvi Pragya Controversy Statement: पळून जाणाऱ्या मुलींच्या तंगड्या तोडा; साध्वी प्रज्ञासिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT