Cervical cancer vaccine  saam tv
मुंबई/पुणे

गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील पहिली भारतीय लस लवकरच उपलब्ध होणार

महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर (Cervical cancer) उपचार करण्यासाठी लवकरच पहिली भारतीय लस उपलब्ध होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर (Cervical cancer) उपचार करण्यासाठी लवकरच पहिली भारतीय लस उपलब्ध होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून विकसित करण्यात आलेल्या या लसीला केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने मान्यता दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ( Adar Poonawalla News In Marathi )

देशात स्तनाच्या कर्करोगानंतर सर्वात अधिक रुग्ण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे आढळून येतात. देशात दर एक लाख महिलाच्या मागे २० महिला या या कर्करोगाशी झुंज देत आहे. या कर्करोगाची लक्षणे माहिती आणि रोगाविषयी जागरुकता नसल्याने महिलांमध्ये सदर कर्कराग वाढत आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. सदर कर्करोग हा ह्यूमन पॅपिलोमा नामक विषाणुमुळे हा कर्करोग होता. ह्यूमन पॅपिलोमा विषाणू हा लैगिंक संबंध केल्याने पसरतो. दरम्यान, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लस (Vaccine) दिली जाते. मात्र, या लसीमध्ये भारतीय पर्याय नसल्याने भारतीयांना या आजारावर मात करणे परवडणारे नव्हते.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ट्विट करत सांगितले की, 'महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी प्रथमच भारतीय एचपीव्ही लस उपलब्ध होणार आहे. ही लस परवडणारी असून लवकर उपलब्ध होणार आहे. आम्ही या वर्षाच्या अखेरीस ही लस उपलब्ध करून देणार आहोत. या लसीला मंजूरी दिल्याबद्दल केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालय आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आभार मानतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT