Sayaji Shinde Latest Marathi News, Sayaji Shinde News Saam Tv
मुंबई/पुणे

तिथं १५८ जीव घेण्याची परवानगी मिळतेच कशी? सयाजी शिंदेंचा सायन रुग्णालयाला संतप्त सवाल

सायन रुग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी ही झाडे तोडण्यात येणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध सायन रुग्णालयात (Hospital) तब्बल १५८ झाडे तोडण्यात येणार असल्याची बाब समोर आली आहे. आणि याचा तीव्र शब्दात निषेध प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी केला आहे. रुग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी ही झाडे तोडण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे. शिवाय यातील २ झाडे देखील आज तोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याचं बाबींचा निषेध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे. (Sayaji Shinde Latest Marathi News)

याबाबात अधिक बोलताना सयाजी शिंदे (Sayaji Shinde) म्हणाले की, ज्या रुग्णालयात जीव वाचवला जातो त्याच ठिकाणी १५८ जीव घेतलेच कसे जातात याचं आश्चर्य वाटतं आहे. कृपया माझी रूग्णालय (Hospital) प्रशासनाला विनंती आहे की, अशाप्रकारे १५८ जीव घेऊ नका. कारण यामुळे त्या झाडावर असणाऱ्या पक्षांची घरटी देखील कायमस्वरुपी मरणार आहेत. शिवाय त्यात असणारे छोटे जीव देखील मरणार आहेत. कृपया रूग्णालय प्रश्नासनाने हे टाळावे आणि इतर काही पर्याय निर्माण करता येतोय का याचा विचार करावा, अशी मागणी सयाजी शिंदे यांनी केली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT