Raj Thackeray News updates, Raj Thackeray To Visit Ayodhya,  Saam TV
मुंबई/पुणे

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कार्यकर्तेही जाणार; मनसे रेल्वे बुक करणार

१० ते १२ ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातून दोन घोषणा केल्या. पहिली म्हणजे १ तारखेला औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार. आणि दुसरी म्हणजे अतिशय महत्त्वाचं ५ जून रोजी अयोध्येला जाणार. आता अयोध्या दौऱ्याविषयी आणखी एक माहिती समोर आली आहे. कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून (MNS) ट्रेन बुक करण्यात येणार आहे. १० ते १२ ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून या ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. राज ठाकरे मागच्या काही काळापासून आपली भूमिका अतिशय प्रखरपणे मांडत आहेत. (Raj Thackeray To Visit Ayodhya)

राज ठाकरेंनी गुढीपाडवा सभेत घेतलेल्या मशिदींवरील भोंग्याविरोधातील भूमिकेवर ते उत्तर सभेत ठाम राहिले आहेत. दरम्यान एकीकडे राज ठाकरे अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. तर दुसऱ्या बाजून मंत्री आदित्या ठाकरेही अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. त्यांनी अजून दौऱ्याची तारीख जाहीर केलेली नाही. नाशिकमध्ये संजय राऊतांनी बोलताना आदित्या ठाकरे अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याची माहिती दिली होती. आदित्या ठाकरेंनीही याला अधिकृत दुजोरा दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT