विनापरवाना ऊसाचे गाळप पडले महागात; 'त्या' 9 कारखान्यांना ठोठावला 38 कोटींचा दंड Saam TV
मुंबई/पुणे

विनापरवाना ऊसाचे गाळप पडले महागात; 'त्या' 9 कारखान्यांना ठोठावला 38 कोटींचा दंड

दंड ठोठावण्यात आलेल्या 9 कारखान्यांपैकी 4 पुण्यातील, 2 सांगली, सातारा आणि 2 सोलापूरमधील आहेत. तर सर्वाधिक दंड ठोठावलेला साखर कारखाना सांगलीच्या राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांचा आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : विनापरवाना ऊसाचे गाळप केलेल्या प्रकरणी 9 साखर कारखान्यांना साखर (Sugar Factories) आयुक्तांनी तब्बल 38 कोटी 17 लाख 31 हजार 500 रुपये दंड ठोठावला आहे. विनापरवाना (Unlicensed) गाळप केलेले साखर कारखान्यामध्ये सर्वाधिक भाजप- राष्ट्रवादीच्या (BJP-NCP) नेत्यांच्या कारखान्यांचा सहभाग आहे.

दंड ठोठावण्यात आलेल्या नऊ कारखान्यांपैकी चार पुण्यातील, (Pune) दोन सांगली, (Sangli) एक सातारा (Satara) आणि दोन सोलापूरमधील (solapur) आहेत असा कारखान्याचा समावेश आहे. दरम्यान या नऊ कारखान्यांमधील सात कारखाने सहकारी तर दोन खासगी आहेत. शिवाय सर्वाधिक साडे सात कोटी दंड ठोठावलेला साखर कारखाना सांगलीच्या राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांचा आहे.

साखर आयुक्तांंनी आधीच दिलेला इशारा -

राज्यातील कारखान्यांनी ऊस गाळप हंगामाकरिता साखर कारखान्यांनी ऑनलाईन ऊस गाळप परवाना अर्ज सादर करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी आधीच दिले होते. तर ऊस गाळप करण्यासाठी परवाना न घेतल्यास कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिलेला आणि अखेर आज या नऊ कारखान्यांवरती आयुक्तांनी कारवाई केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT