वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर ...आचार्य तुषार भोसलेंचा सरकारला शेवटचा इशारा Saam Tv
मुंबई/पुणे

वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर... आचार्य तुषार भोसलेंचा सरकारला शेवटचा इशारा

वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल.. असा आचार्य तुषार भोसलेंनी सरकारला शेवटचा इशारा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : असंख्य वारकरी पायी वारी करणार असून पोलिसांनी Police अनेक वारकऱ्यांना नोटीस दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी सरकारला Government ठणकावले आहे. Acharya Tushar Bhosale's warning to the State government

भारतीय जनता पार्टी BJP पूर्ण ताकदीनिशी वारकऱ्यांच्या सोबत आहे, असेही ते म्हणाले. राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे अनेक वारकरी आता पायी निघणार आहेत. शांत आणि संयमी वारकऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवून सरकारने घाबरवू नये. असे ते म्हणाले आहेत. "आमचा या सरकारला हा शेवटचा इशारा आहे की वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल आणि त्यात या सरकारची होळी केली जाईल. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी वारकऱ्यांच्या सोबत आहे". असे ते म्हणाले.

हे देखील पहा-

मागील काही दिवसांपूर्वी यंदाच्या तुषार भोसले यांनी आषाढी वारी संदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. तातडीने सरकारने हा निर्णय बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील, असा इशारा दिला होता. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीच्या निर्णयाचा विरोध केला होता. राज्य सरकारने हा निर्णय घेऊन वारकऱ्यांचा अपमान केला आहे.

वारकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा असे त्यांनी सरकारला बजावले होते. नाहीतर अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar जबाबदार असतील, असे तुषार भोसले यांनी म्हटले होते. Acharya Tushar Bhosale's warning to the State government

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले होते. कोरोना Corona विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी, आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात आली. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे तेच पालखी सोहळे बसने पंढरपुरात दाखल होतील. असे सांगण्यात आले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT