Palghar Accident  Saam TV
मुंबई/पुणे

Palghar Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार-बसमध्ये भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

अपघात इतका भीषण होता की बस आणि कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> रुपेश पाटील

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरी बसच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. डहाणूतील महालक्ष्मीजवळ हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने शासकीय रुग्णालय कासा येथे दाखल करण्यात आले आहे.

अपघात इतका भीषण होता की बस आणि कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतील महालक्ष्मीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गुजरातहून एक कार मुंबईच्या दिशेनं येत होती. डहाणूजवळ पोहोचले असता अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव लक्झरी बसवर कार आदळली.हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे.

अपघातात कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर या अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. बसचालक या अपघातात जखमी झाला आहे.

कारमधील चारही प्रवासी हे गुजरातच्या बारडोली मधील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

SCROLL FOR NEXT