Kerala Accident News  saam tv
मुंबई/पुणे

Parbhani Accident: शाळेत झेंडावंदनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचा अपघात, 4 जण गंभीर जखमी

दुचाकी आणि ऑटोमध्ये पाथरी-सोनपेठ मार्गावर भीषण अपघात झाला.

साम टिव्ही ब्युरो

परभणी : शाळेत झेंडावंदनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बाईकला भीषण अपघात झाला आहे. अपघतात चार विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत. पाथरी-सोनपेठ मार्गावर ही घटना घडली आहे. (Parbhani News)

दुचाकी आणि ऑटोमध्ये पाथरी-सोनपेठ मार्गावर भीषण अपघात झाला. आज सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. एकच बाईकवर चारही विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाच्या झेंडा वंदनासाठी पाथरीच्या कानसूर येथे निघाले होते. चक्रधर स्वामी विद्यालयात हे चारही विद्यार्थी नववीत शिक्षण घेत आहेत. मात्र रस्त्यातच त्यांच्या बाईकला अपघात झाला.

चारही विद्यार्थी डाकू पिंपरी गावाचे रहिवासी आहेत. स्वप्निल चव्हाण, राहुल तिथे, शंतनू सोनवणे, योगानंद घुगे असे या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अपघात इतका भीषण होता की एका विद्यार्थ्यांचा हात रस्त्यावर तुटून पडला. विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT