Uran Accident  
मुंबई/पुणे

Uran Bike Accident: कामावरून घरी परतताना काळाचा घाला; अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, २ जणांचा मृत्यू

Uran - Panvel Highway Accident: एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. दुचाकीचा अपघात उरण-पनवेल मार्गावर झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे, साम प्रतिनिधी

उरण- पनवेल मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. कामावरून घरी जाणाऱ्या दोन तरुणांवर काळाने घाला घातलाय. दुचाकीचा हा अपघात उरणमधील जासई उड्डाणपुलावर झाला. यात दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय.

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याननंतर वाहन चालक फरार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. या अपघाताप्रकरणी उरण पोलीस अपघात कसा झाला याबद्दल अधिक तपास करत आहेत. अभिजित भुवड आणि अनिश नायर अशी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. उरण पनवेल मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज उरणमधील जासई उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला.

या अपघातात मोटरसायकल वरील दोन तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. उरणमधील बोरी गावातील अभिजित भुवड ( वय 30) आणि अनिश नायर (वय 26) तरुण कामावरून आपल्या घरी जात होते. यावेळी उरण पनवेल मार्गावरील जासई उड्डाणंपुलावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालाय. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

२ दिवसांपूर्वी लग्न, हनिमूनला जाण्याची तयारी, पहाटे नवरदेवाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला, नेमकं घडलं काय?

आनंदाची बातमी! 'या' तारखेला महिलांच्या बँक खात्यात येणार १०-१० हजार रुपये

SCROLL FOR NEXT