Pune Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: टेम्पोचा भीषण अपघात; भरधाव वेगात वाहन थेट हवेत फेकले गेले अन्...

Accident News: भरधाव टेम्पोचे नियत्रंण सुटल्याने टेम्पो २ दुचाकीला धडक देत चौकातील छोट्या दुभाजकावर आदळला

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बादवे

Pune News: पुण्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात मंतरवाडी कात्रज रोड मार्गावर भीषण अपघात झालाय. यात भरधाव वेगात असलेल्या टेम्पोचं मोठं नुकसान झालंय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भरधाव टेम्पोचे नियत्रंण सुटल्याने टेम्पो २ दुचाकीला धडक देत चौकातील छोट्या दुभाजकावर आदळला आणि पेट्रोल पंपच्या दिशेने पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की टेम्पोचे मागील दोन्ही टायर निखळले गेले.

या घटनेत टेम्पो चालक जखमी झाला असून सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरीद शेख (वय ३२ रा.औसा लातूर ) असे टेम्पो चालकाचे नाव आहे.

हा टेम्पोमध्ये ( एमएच १३ ए एफ ८५०१) प्लास्टिक घेऊन पुण्याहून निघाला होता. टेम्पो मंतरवाडी मार्गात आले असता, चालकाचे टेम्पो वरील नियत्रंण सुटल्याने दूचाकीला घासत चौकातील दुभाजकावर चढला आणि थेट उडून तो पुढे जाऊन पेट्रोल पंपसमोर पलटी झाला. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन टेम्पोमधील चालकाला सुखरूप बाहेर काढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

How to Peel Garlic: आता काही सेकंदात सोलून होईल लसूण; फक्त फॉलो करा या 3 टीप्स

SCROLL FOR NEXT